कोरोना, जीएसटी आणि नोटबंदी हे हॉवर्ड विद्यापीठात अपयशाची केस स्टडी म्हणून शिकवले जाईल; राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. ६ जुलै २०२० : देशात कोविड -१९ ची स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे, आणि भारत आता कोविड -१९ च्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना नेहमीच निशाणावर धरले आहे. सध्या त्यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “भविष्यात हॉवर्ड विद्यापीठामध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा ‘या’ तीन गोष्टींचा उल्लेख असेल” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत नोटबंदी, जीएसटी आणि कोविड -१९ या तीन विषयांवरून नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हॉवर्ड विद्यापीठाच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे तीन विषय शिकवलं जाईल.

या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी कोविड -१९ ला २१ दिवसांमध्ये नष्ट करू असे म्हणताना दिसले आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की २१ दिवसात या महामारीवर विजय मिळवणे तर सोडा पण सध्या जागतिक क्रमवारीत भारत कोविड -१९ च्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे हे संकट येऊन आता १०० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

कोविड -१९ चे संकट आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. त्यावेळी सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण लॉकडाउनला तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही. सध्या देशात जवळपास सात लाख कोरोनाचे रुग्ण असून १९ हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

, दि. ६ जुलै २०२० : देशात कोविड -१९ ची स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे, आणि भारत आता कोविड -१९ च्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना नेहमीच निशाणावर धरले आहे. सध्या त्यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “भविष्यात हॉवर्ड विद्यापीठामध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा ‘या’ तीन गोष्टींचा उल्लेख असेल” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत नोटबंदी, जीएसटी आणि कोविड -१९ या तीन विषयांवरून नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हॉवर्ड विद्यापीठाच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे तीन विषय शिकवलं जाईल.

या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी कोविड -१९ ला २१ दिवसांमध्ये नष्ट करू असे म्हणताना दिसले आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की २१ दिवसात या महामारीवर विजय मिळवणे तर सोडा पण सध्या जागतिक क्रमवारीत भारत कोविड -१९ च्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे हे संकट येऊन आता १०० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

कोविड -१९ चे संकट आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. त्यावेळी सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण लॉकडाउनला तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही. सध्या देशात जवळपास सात लाख कोरोनाचे रुग्ण असून १९ हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा