हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई, ६ जुलै २०२० : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, उद्योगांसाठी लागणारी एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित केल्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय लवकरच सरकार कडून घेण्यात येईल.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हॉटेल मॅनेजमेंटच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना उद्धव म्हणाले की, “हॉटेल पुन्हा सुरू करण्यात अडथळे नाहीत पण त्यांना राज्य सरकारने तयार केलेल्या एसओपीचे पालन करावे लागेल. एसओपी तयार करण्यात येत असून लवकरच तील अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेता येईल. ”

आरोग्य आणि सुरक्षेच्या उपायांवर लक्ष केंद्रित करून हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी पुढे हॉटेल्सच्या व्यवस्थापनांना सांगितले की, कोणत्याही कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकू नका. या बैठकीस उपस्थिती असलेले पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविड १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर हॉटेल उद्योगासाठी स्वत: नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.

या बैठकीत हॉटेल उद्योगाच्या प्रतिनिधींनी पाणी व वीजदरात सवलत तसेच मालमत्ता करात सवलत देण्याची गरज यावर जोर दिला. यावेळी बोलताना एका अधिका-याने सांगितले की छोट्या-मोठ्या हॉटेल्स, पर्यटन स्थळे, वाहतूक, मार्गदर्शक, गृहविभागासाठी आणि इतरांसाठी विभाग-वार एसओपी तयार केल्या जात आहेत. “सर्व हॉटेल्स एकाच वेळी उघडले जाणार नाहीत. हे हळू हळू चालू केले जातील, असेही या अधिका-याने सांगितले. हे पुन्हा सुरू करणे हे तेथील भौगोलिक स्थिती किंवा तेथील विभागावर आधारित असू शकते.

शिवसेनेशी संबंधित भारतीय कामगार सेनेशी (कामगार संघटना) झालेल्या आणखी एका बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, वेतन कपात करणे इतपत अद्याप ठीक आहे, परंतू कंपन्यांनी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकू नये. “मी काही कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी बोलत आहे ” असे ही त्यांनी या संघटनांना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा