पुणे ६ जुलै २०२० : पुण्यात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी २ खून झालेली घटना घडल्याने पुणे शहर हादरले आहे. दोन्ही खून टोकदार शास्त्रांनी वार करून झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही ठिकाणाच्या आरोपीनी धूम ठोकल्याचे समजते. दोन्हीं घटनांपैकी एक घटना हि हडपसर परिसरातील तर दुसरी घटना कोथरूड परिसरात घडली आहे.
हडपसर मधील आकाश लक्ष्मण भोसले (२३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून आकाश हा चिकन विक्रेता असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुपारी ४ च्या सुमारास हि घटना घडली आसल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. आरोपी अद्याप फरार असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
दुसरा खुन काही वेळा पूर्वीच कोथरूड परिसरात घडला. गॅरेज चालकाच्या डोक्यात टोकदार शस्त्रांनी वार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.खून झालेली व्यक्ती गॅरेज चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.व तसेच गुन्हेगाराचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु केली असून पोलीस घटनास्थळी पोहचले असता गॅरेज चालकाला रुग्णालया मध्ये हलवण्यात आल्याचे सांगितले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे दोन्ही खून पुर्व वैमानस्येतून झाले असावेत अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील गुन्हेगारी विश्वाची ही परिस्थिती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत . ह्या अशा थरारक घटनांनी पुणे शहर वारवांर हादरत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी










































