ॲड्. अशोक पवार यांची आलेगाव पागा येथील तलावाची पहाणी

शिरूर, दि. ७ जुलै २०२०: येथे नागरिकांसाठी पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. प्रत्येक नागरिकाला मुबलक आणि पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. आणि तो त्यांचा हक्क देखील आहे. असे काल शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड् अशोक पवार यांनी प्रथमच आलेगाव पागा येथील तलावावर जाऊन त्या ठिकाणी तलावाची पाहणी केली.

तेथील ग्रामस्थांना कॅनॉल दुरुस्तीसाठी आश्वासन देऊन आलेगाव पागा मधील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा. पै. बाळासाहेब वाघचौरे, यांची भेट घेतली. त्या नंतर आलेगाव पागा येथील १० ते १५ वर्षा पासुन बंद असलेली साई पाणीपुरवठा संस्थां अंतर्गत तळ्यांमधील दरवाजा आणि बेरिंग गिअर बॉक्स बनवून दिले व कॅनलमधून पाणी सोडण्यात आले.

त्याप्रसंगी प्रा. भाऊसाहेब भोसले, शिवाजी वाघचौरे, मुरली वाघचौरे, लालासाहेब वाघचौरे, रघुनाथ खराडे, ज्ञानदेव वेताळ, आदींची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा