मुलगा झाला म्हणून वाटले पेढे, पण पेढे वाटणारा कोरोना पॉझिटिव्ह…..

काटकळंबा (नांदेड), दि. १० जुलै २०२०: ऐकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता उद्रेक पहायला मिळतोय. तर दुसरीकडे नागरिक मात्र आपल्या हालगर्जीपासून धडे घ्यायला तयार नाहीत, ज्या मुळे महाराष्ट्रात विविध घटना घडत आहेत. नांदेडच्या कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात एका युवकाने मुलगा झाल्याच्या आनंदात गावभर पेढे वाटले आणि त्याचाच कोरोना रिपोर्ट पाॅजिटिव्ह आला.

कटकळंबा गावतील २४ वर्षीय तरुणाला मुलगा झाला आणि तो पाहण्यासाठी तो औरंगाबाद हून गावी आला. त्यांने मुलाला पाहीले व नंतर आनंदाच्या भरात त्याने आपल्या सर्व मित्रमंडळी सह अनेक निकटवर्तीयांना पेढे वाटले. ऐव्हढेच नव्हे तर तो औरंगाबाद वरुन परत आल्या नंतर नातेवाईकांची देखील भेट घेतली होती. या सर्व प्रकारमुळे तुलक्यातील तसेच गावातील प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आसून गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे. युवकाच्या संपर्कात आलेल्या ११६ व्यक्तींना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्या बरोबरच रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

या सर्व घटनेमुळे प्रशासनाच्या नियमांना नागरिक अश्या पद्धतीने प्रतिसाद देत फज्जा उडवल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. पण या हलगर्जी पणामुळे आज संपूर्ण गावावर कोरोनाची चादर पसरणार की काय याची भिती निर्माण होऊन बसली आहे. तर शहराला आपल्या विळख्यात घेणारा कोरोना आता ग्रामीण भागाकडे देखील हळूहळू आगेकूच करताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा