माढा, दि. ११ जुलै २०२०: माढातालुक्यातील हरीनगर बेंबळे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ बेंबळे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा माढा तालुक्याचे माजी उपसभापती तुकाराम ढवळे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव भोसले होते.
तुकाराम ढवळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघाचा विकास आमदार बबनराव शिंदे जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंदे यांच्यामुळे झालेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप राव भोसले म्हणाले की हरी नगर येथील काही विकास कामे मागे राहिली होती. परंतु जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बंडूनाना ढवळे यांच्या सहकार्यामुळे याठिकाणी ५५ लाख रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ होत आहे.
आमदार बबनराव शिंदे यांच्या आमदार फंडातून मंदिर सभामंडप यासाठी पाच लाख रुपये,हरीनगर ते अमरापुर रस्त्याच्या कामासाठी २२ लाख ५० हजार रुपये,दलित वस्ती सुधारणा कामासाठी १५ लाख रुपये व जिल्हा नियोजन मंडळातर्फे ११ लाख रुपये मंजूर झाले आहेत अंगणवाडी सुशोभीकरणासाठी १ लाख ६० हजार रुपये मंजूर झाले आहेत असे यावेळी सांगण्यात आले यावेळी बेंबळेचे माजी सरपंच गोविंद भोसले, दिगंबर भोसले, संजय पवार, बासुभाई मुलानी, सरपंच किशोर कदम, उपसरपंच एकनाथ भोसले, रत्नदीप भोसले आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील