आज जाहीर होणार सीबीएससी दहावीचा निकाल

नवी दिल्ली, दि. १५ जुलै २०२०: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल आज म्हणजे १५ जुलै २०२० रोजी जाहीर होईल. यासह सीबीएसई दहावीची परीक्षा दिलेल्या सुमारे १८ लाख मुलांची प्रतीक्षाही संपेल. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई १० वीचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर केला जाईल असे ट्विट करून माहिती दिली. तथापि, सीबीएसई १० वीचा निकाल जाहीर करण्यासाठी निश्चित वेळ नाही.

सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर होताच त्याचा निकाल अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊन तपासता येतो. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र सोबत ठेवावे लागेल. निकाल तपासण्यासाठी, रोल नंबरशिवाय इतर तपशीलदेखील आवश्यक असतील जे अ‍ॅडमिट कार्डमध्ये आहेत. सीबीएसई १० वी चा निकाल cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर जाहीर केला जाईल.

दहावीचा निकाल या प्रमाणे तपासा

> सीबीएसईच्या cbse.nic.in, cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

> वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील सीबीएसई बोर्ड निकाल २०२० वर क्लिक करा.

> सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल २०२० संबंधित लिंकवर क्लिक करा.

> आपला रोल नंबर आणि संबंधित तपशील भरा.

> आपण सबमिट करताच आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.

> प्रिंट आउट द्वारे निकालाची प्रत काढली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा