इंदापुरात शॉर्ट सर्किटने दुकानाला आग…. लाखोंचे नुकसान…

इंदापूर, दि. १८ जुलै २०२०: इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या नारायण शेटे पाटील यांच्या मालकीचे सद्गुरू जनरल स्टोअर्स या दुकानाला शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच तातडीने शेजाऱ्यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळविले.

नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून साधारणतः दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नारायण शेटे पाटील यांनी सांगितले.

याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये वीजवाहक तारा ह्या अतिशय धोकादायक स्थितीत आहेत. वेळोवेळी शहरातील व्यापाऱ्यांनी याबाबत महावितरणला पत्रव्यवहार केला होता .यावर महावितरणांनी कसलीही कार्यवाही केली नसल्याने हा धोका उद्भवत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच महावितरणने त्वरित मुख्य बाजारपेठेतील धोकादायक विस्तारा बदलून भूमिगत वीज वाहिनी टाकण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा