वृत्तपत्रांसोबत आता फळे-भाजीपाला मिळणार घरपोच
ठाणे, दि. १८ जुलै २०२०: कोरोनाच्या संकटात ‘ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशन’च्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच वृत्तपत्रविक्रेते या कालावधीतील गरज लक्षात घेऊन ताजा भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या १० विक्रेत्यांनी ही सेवा सुरू केली असून त्यांच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
वृत्तपत्रविक्रेत्यांची परिस्थिती तशी बेताचीच असते. पण सामाजिक सहकार्यासाठी स्वत:हून पुढे येण्याची त्याची संकल्पना ही कौतुकास्पद ठरते . सध्याच्या या सामाजिक गरजेच्या दृष्टीने वृत्तपत्रवाटपाच्या सेवेला जोडून येथील विक्रेत्यांनी भाजीपाला, फळे आणि घरगुती किराणा ठाणेकर जनतेला घरपोच देण्याचा विढा उचल्ला आहे.
वर्षभर वृत्तपत्रविक्रेता घरपोच सेवा देत असतो. त्याच्या या सेवेला जोडून ठाणेकरांची भाजीपाला, किराणा घरपोच करण्याची सेवा त्यांच्याकडून ठाण्यातील गगनचुंबी इमारती, बैठ्या चाळी आदी नागरी वस्त्यांत केली जाणार आहे. सध्या ठाण्यामध्ये १० वृत्तपत्रविक्रेते या सेवेसाठी तैनात आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे