पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. १८ जुलै २०२०: कोविड -१९ च्या संकटामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अजून हे संकट किती काळ राहणार आहे याची देखील कोणतीही शाश्वती नाही. सर्वत्र या विषयांवर लस शोधण्याचे काम चालू आहे. मात्र अद्याप कोणतीही लस बाजारात आलेली नाही. सर्वच बंद असल्यामुळे बेरोजगारी देखील वाढत आहे. त्यात या संकटाच्या काळात पोलिसांना २४ तास आपली सेवा द्यावी लागत आहे. अशात आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात तब्बल १२,५३८ पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे.

पोलीस भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही खुषखबर अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून दिली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षा अखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मागच्या वर्षी देखील पोलीस भरती झाली नव्हती. त्याआधी २०१८ मध्ये भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ३४०० जागांसाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा