जी पापं केली आहेस त्याची फळं तुला भोगावीच लागतील, सलमान वर टीका

13

मुंबई, दि. १९ जुलै २०२०: बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने देशातील शेतकऱ्यांना सलाम करण्यासाठी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सलमान चिखलाने माखलेला दिसत आहे. शेती करणाऱ्या सलमानचा फोटो सोशल मिडीयावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होत आहे तर आता अभिनेता कमाल आर खान ने देखील त्यात उडी घेत सलमानच्या त्या फोटोवर कमेंट केली आहे.

अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो.तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो.यावेळी त्याने सलमान खानवर निशाणा साधला आहे. सलमानने शेती करतानाचा एक फोटो ट्विट केला होता.या फोटोवर त्याने उपरोधिक टोला लगावला आहे.

या फोटोची कमाल खानने खिल्ली उडवली आहे. “आता रडून काय फायदा? जी पापं केली आहेस त्याची फळं तुला भोगावीच लागतील.”असं ट्विट त्याने केलं आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सलमानच्या चाहत्यांनी कमाल खानवर जोरदार टीका केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी