कल्याण-डोंबिवलीतील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाउन

कल्याण, दि. २० जुलै २०२०: कल्याण-डोंबिवलीतील वाढती रुग्ण संख्या पाहून महापालिकेने लॉकडाउन हा आणखी एक आठवडा वाढवला होता मात्र आज त्याचा कालावधी संपला आहे. केडीएमसी ने कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. मात्र हे कंटेन्मेंट झोनमध्ये वगळता इतर भागामध्ये शिथीलता देण्यात आली आहे.

एवढंच नव्हे तर कल्याण-डोंबिवलीत धारावी पॅटर्न सुद्धा राबवण्यात येत आहे, त्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ४८ प्रभागांमध्ये हा लॉकडाउन वाढवला आहे.

सुरूवातीला २ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन १२ जुलैपासून लॉकडाउनला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर महापालिकेने लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याबद्दलचे आदेश काढले असून, कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. भाजी मार्केट आणि दुकाने ही पी १ आणि पी २ तत्वावर चालवण्याची परवानगी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा