शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा कर्जत तालुका दूध संघाची मागणी

कर्जत, दि. २० जुलै २०२०: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा अशी मागणी कर्जत तालुका दूध संघाने निवेदनाद्वारे केली आहे. मागील चार महिन्यांपासून दुधाला अत्यंत अल्प दर १५ ते २० रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. सध्या दुधाचे भाव ३•५८•५ या गुणप्रतिला २० रुपये असा आहे. परंतु अनेक दूध उत्पादकांच्या गायींच्या दुधाला फॅट व एसएनएफ येत नाही.साधारण सगळ्यात कमी भाव शेतकऱ्याला प्रति लीटर १६ रुपये इतका आहे.

तसेच पशुखाद्य गोळी, भूसा, शेंगदाणा पेंड,सरकी पेंड, यांचे पोत्याचे भाव १५०० ते २००० रुपये आहे. या बरोबर ओला आणि सुका चाराही जनावराना घालावा लागतो. तसेच औषोधोपचाराचा खर्च असतो. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या हातात जनावरांचे शेण देखील पडत नाही.

मध्यंतरीच्या काळात दुधाला चांगला आणि योग्य भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु आता दुधाला चांगला भाव नाही आणि जनावरांचे बाजार बंद असल्याने गायी बाजारात विकता येत नाहीत. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीतही दूध उत्पादक शेतकरी दूध व्यावसाय करीत आहेत.

या सर्व प्रश्नावर सरकारने एक समिती नेमून दूध व्यावसायाचा अभ्यास करुन वरील सर्व हिशोब लक्षात घेता दूध उत्पादकाला प्रति लीटर ३० रुपये भाव द्यावा. असे न झाल्यास दूध उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील. तरी शासनाने दुधाला ३० रुपये प्रतीलीटर भाव देऊन शेतकरी जगवावा. प्रती लीटर १० रुपये अनुदान द्यावे सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशा मागणीचे निवेदन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यावसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्यासह खासदार डॉ.सुजय विखे पा.आणि आमदार रोहित पवार यांना देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा