अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे रक्तदान शिबीर

हडपसर, दि. २२ जुलै २०२० :आज रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना सारख्या महाभयंकर रोगामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील जनतेला रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आव्हान केले आहे.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून, हवेली तालुक्यातील हडपसर गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने व नगरसेवक योगेश ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दि. २२ जुलै रोजी रक्त संकलित करण्यात आले. यावेळी अंदाजे २० बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या आहेत व संकलित झालेल्या रक्तपिशव्या राज्य सरकारला सुपूर्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी बोलताना सांगितले.

“स्वच्छेने” रक्तदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण कडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेवक सागरराजे भोसले, प्रसिध्द मराठी अभिनेते प्रशांत बोगम, व ससाणे वाडा पंच मंडळाचे उपअध्यक्ष दत्तात्रय ससाणे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा