पुणे , दि. २२ जुलै २०२० : आज पासून पु.ल. देशपांडे उद्यानामध्ये कोरोना चाचणीसाठी स्वँब सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रभाग क्र. 30 मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ह्या सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत व त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांची स्वँब टेस्ट करण्यात येत आहे.
दि. २६ जून २०२० रोजी प्रभाग क्र.३० चे नगरसेवक आनंद रमेश रिठे यांनी पुणे महापालिका आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून , प्रशासनाच्या व नागरिकांच्या सोयीसाठी पु.ल. देशपांडे उद्यान येथे सेंटर सुरू करण्यासाठी मागणी केली होती.
पुणे महानगरपालिकेने पुणे शहरात विविध ठिकाणी स्वँब सेंटर सुरू केले आहेत. प्रभाग क्र.३० मधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे , त्या दृष्टीने जनता वसाहत, अण्णाभाऊ साठे वसाहत, दांडेकर पूल वसाहत, पानमळा वसाहत, स.नं.१३२ दत्तवाडी, समतानगर, येथे व आजूबाजूच्या परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे.
सदर परिसरातील लोकांसाठी स्वँब सेंटर उपलब्ध आहेत , पण ती तपासणी सिंहगड इन्स्टिट्यूट व लायगुडे हॉस्पिटल येथे करण्यात येते . ह्या परिसरातील नागरिकांना सदर ठिकाणी तपासणी साठी ने- आण करणे प्रशासनाची व रुग्णांची धावपळ होते. शहरात प्रादुर्भाव वाढत आहे, त्या दृष्टीने जवळपास कोरोना स्वँब सेंटर उपलब्ध करण्यात यावी. अशी मागणी या वेळी करण्यात आली होती.
आजपासून नगरसेवक आनंद रिठे यांच्या प्रयत्नातून पु.ल. देशपांडे उद्यान येथे जलद कोरोना चाचणीसाठी स्वँब सेंटर सुरु झाले आहे. यावेळी नगरसेवक आनंद रिठे यांनी नागरिकांना आवाहन केले की., “कोणाला कोविड १९ ची लक्षणे जाणवत असतील तर तिथे जावून कोविड१९ ची चाचणी करुन घ्यावी. तसेच हे केंद्र चालू केल्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ,आयुक्त विक्रम कुमार ,अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, उपायुक्त जयंत भोसेकर, वॉर्ड ऑफिसर संभाजी खोत, उद्यान अधीक्षक घोरपडे साहेब यांचे सर्वांचे मनापासून आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.