भारताबरोबर राज्यात २४ तासात कोरोना रुग्णांमधे मोठी वाढ…..

मुंबई, दि. २४ जुलै २०२०: भारतात कोरोनाने हैदोस घातला असून सरकार समोर याला आटोक्यात आणण्यासाठी फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.दर दिवशी कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत तर मृत्यूची नोंद देखील आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.तर हि आकडेवारी दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत आहे.

गेल्या २४ तासात भारतात ४५ हजारा पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण भेटले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ४ लाख २६ हजारांहून अधिक कोरोना सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत ७ लाख ८२ हजार ६०६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या साडेतीन लाखांपेक्षा अधिक आहे.

भारतासाठी दिलासा देणारी बातमी

भारतात बुधवार सकाळपासून २४ तासांत २९ हजार ५५७ कोरोना बाधित करोनामुक्त झाले असून.एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होण्याचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. कोरोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण आता ६३.१८ टक्के इतके झाले आहे.तर भारतासाठी हि एक चांगली आणि दिलासा देणारी गोष्ट आहे.

राज्याची कोरोना गाडी सुसाटच

महाराष्ट्र राज्य कोरोना रुग्णांच्या बाबतीत देशात प्रथम स्थानी असून,राज्यातील सरकार त्यासाठी युद्ध पातळीवर काम देखील करत आहे. राज्यात बुधावारी गेल्या २४ तासात ९,८९५ नवे रुग्ण आढळले. तर ६,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आसून,२९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आतापर्यंत राज्यात ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली.त्यापैकी १ लाख ९४ हजार २५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

महाराष्ट्रासाठी दिलासादायक

महाराष्ट्र हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर जरी असला तरी कोरोनामुक्ती मधे देखील तोच पहिला आहे.गेल्या ३ दिवसापासून महाराष्ट्रातील कोरोनामुक्तीच्या रुग्णांंचा वेग वाढला आहे.तर मंगळवारी ७,१८८,बुधवारी ५,५५२ आणि गुरुवारी म्हणजेच काल ६,४८४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहे.राज्यात आतापर्यंत १,९४,२५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर १,४०,०९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या जागतिक महामारीत अमेरिका हा प्रथम स्थानी आहे.तर तिथल्या चाचण्या या मोठ्या प्रमाणावर होत असून कोरोना रुग्ण देखील वाढत आहेत.तर अमेरिकेनंतर भारत हा असा देश आहे जिथे मागील काही दिवसांत देशातील कोरोनाविषयक चाचण्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून.अवघ्या ३ दिवसांत सुमारे १० लाख चाचण्या झाल्या.त्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांनी दीड कोटीचा टप्पा ओलांडला आहे.जे जगाच्या तुलनेत अमेरिकेनंतर चाचण्यांनमधे भारत हा दुस-या स्थानी येतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा