मुंबई, दि. २६ जुलै २०२०: महाराष्ट्रात एकिकडे कोरोनाचा उद्रेक होताना दिसतोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या आनेक दिवसांपासून राणे घराणे सतत राज्य सरकारवर टिका करतय तर आता ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर घणघाती आरोप केला आहे.
कोरोनाच्या काळात अनेक खासगी रुग्णालयं रुग्णाची आर्थिक पिळवणुक करताना दिसत आहेत. तर त्यांच्या मुसक्या कधी आवळण्यात येतील, असे विरोधी पक्ष नेहमीच टिका करतोय. तर आतापर्यंत केलेल्या कार्यात राज्य सरकार अपयशी झाल्याचे देखील बोलले जात आहे. अशातच राणे कुंटूबातील नितेश राणे बोले सरकारने कोरोनाचा धंदा केला, असून त्यातून ते पैसे कमवत आहे, आशी गंभीर टिका करत एक व्हिडीयो ट्विटरवर व्हायरल केला. ज्या मध्ये दोन व्यक्तींचे संभाषण असून ते रुग्णालयातीलच आहे, असे नितेश राणे यांनी लिहीले आहे.
नितेश राणे यांनी शेअर केलेला या व्हिडिओ दोन व्यक्ती फोनवरून सुरु असलेल्या चर्चेचे रिकॉर्डिंग असून व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला “करोनाच्या नावाखाली धंदा सुरू केला आहे. हा खुप मोठा धंदा आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून २५-३० कोटी रूपये खर्चून महानगरपालिकेचा पैसा संपवला आहे. आम्ही आमचे डीन आम्ही सर्व कोविड फॅसिलिटीमध्ये जातो तेव्हा पाहतो की हे काय चाललंय? हा तर धंदा सुरू आहे. त्या लोकांना करोना संपवायचाच नाहीये. कारण कोरोना संपवला तर हा धंदा बंद होईल,” असं सांगत असल्याचं ऐकायला येतंय. अश्या पद्धतीचा व्हिडीयो त्यांनी ट्विटर वर टाकला आहे.
कोरोना काळातील हि व्हिडीयो जर खरी असेल तर लोकशाहीला एक प्रकारे तडा जाईल. जगभरात या महामारीच्या आजाराशी धैर्य आणि शौर्यांने लढा दिला जातोय.मात्र भारतातील परिस्थिती हि जगावेगळी असून इथे राजकारण चालू आहे तर दुसरी कडे प्रसारमाध्यमातील वृत्तामुंळे लोकांना देखील या विषाणुचे गांभीर्यच नसल्याचे पाहायला मिळते.
न्यूज अनकट प्रतिनिधी