तरुणीच्या तोंडात चप्पल, फिरवलं गावभर…..

जळगाव, दि. २६ जुलै २०२०: भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटून गेली, तरी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा काढण्यास कोणत्याच सरकारला दुर्दैवाने यश आलेले नाही. काही दिवसा मागे लहान मुलाच्या अंगावर चटके देण्यात आले होते. तर असाच एक आंधश्रद्धाळू पणाचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंगोळा या गावात उघडकीस आला आहे. ज्या मध्ये एका तरुणीच्या तोंडात चक्क चप्पल धरून गावभर आणि आजूबाजूच्या गावात फिरवण्यात आले आहे.

तरुणी गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होती. अनेक औषधांचें सेवन करून झाले पण तिला फरक पडत नसल्याने अखेर तिच्या घरच्यांनी भाकड मांत्रिकाचा आधार घेतला. मुलीच्या वडिलांनी यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील भाकड मांत्रिकास बोलावले. मांत्रिकाने घरच्यांना तिला भुताची बाधा झाली असून एक दोन नव्हे तर तिच्या शरीरात चक्क ६ भुते आहेत ते सांगितले आणि हे भूत काढण्यासाठी तोंडात चप्पल धरून गावभर फिरवण्याचा घाणेराडा उपाय सांगितला.

मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे मांत्रिक व मुलीच्या घरच्यांनी मुलीला तोंडात पायातील चप्पल धरायला लावून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात तिला फिरवले. मुलीला असे फिरवून झाल्यावर मुलीच्या अंगातील ६ पैकी ४ भूत-प्रेतांना काढले असल्याचं मुलीच्या घरच्यांना सांगितलं आणि पिडीत मुलीच्या परिवाराकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकाळण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती घटनास्थळी दाखल….

हा प्रकार उघडकीस आल्यावर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पथकाने सोमवारी या तरुणीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांचे प्रबोधन केले. मुलीवर अधिक उपचार बाकी आहेत असे ह्या मांत्रिकाने सांगितले होते मात्र तो पुन्हा येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोहाडे व जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेंगोळा येथे जाऊन पिडित कुटुंबाची भेट घेतली. मांत्रिकाकडून अघोरी उपचार करून घेवू नका, असा सल्ला देत कुटुंबियांची समजूत देखील काढण्यात त्यांना यश आले आहे. तसेच मुलीवर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. योग्य वेळी अघोरी उपचारला आळा बसल्यामुळे ग्रामस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा