वन्य प्राणी जीव विशेष – भाग १ सर्प

मराठी नाव: वाळा /अंधासाप

भंडारा-गोंदीया :-कानिला(ही सापाची प्रजाती नाही, पण या सापाला कानिला म्हणतात.)

इंग्लिश:- warm snake

शास्त्रीय_नाव -: Ramphotyphlos braminus

सरासरी लांबी -:१२.५ सें.मी. ( ५-६इंच )
अधिकतम लांबी -:२५ सें.मी. ( ९ इंच )

रंग व आकार -: लालसर तपकिरी किंवा चाँकलेटी.पोटाकडील भाग फिकट. सडपातळ गोलाकार शरीरावर जवळ-जवळ असलेले खवले. डोळे काळ्या रंगाचे असून खूप निरीक्षणांती दिसतात. शेपूट टोकदार असते.

प्रजनन -: तांदळाच्या आकाराची ३-७ अंडी घालते.

खाद्य -: मुंग्या, वाळवी, किटक व किटकांची अंडी व अळ्या.

आढळ -: हा साप भारतात सर्वत्र आढळतो.

वास्तव्य -: मऊ जमिनीत, वाळलेल्या पालापाचोळ्यात किंवा दगडांखाली सापडतो .

वैशिष्ट्ये -: दिनचर. पावसाने मऊ झालेली जमीन उकरण्यासाठी डोक्याचा वापर करतो. हा साप फक्त पावसाळ्यामध्ये जमीनीवर दिसतो, इतर काळात जमीनीखाली दीर्घनिद्रा घेतो.

संदर्भ: “साप” लेखक निलिमकुमार खैरे

अंधश्रद्धा

१) हा साप विषारी असून जनावरांच्या कानात गेल्यास जनावर मरतो..।

उत्तर :- वाळा साप पूर्णपणे बिनविषारी असून, या सापास (विषारी कानिला) समजले जाते. तसेच हा साप उंचावर चढू शकत नाही. त्यामुळे तो जनावरांच्या कानापर्यंत पण पोहचू शकत नाही.

बहूतेकदा या सापास गांडूळ पण समजले जाते, परंतु वाळा व गांडूळ परस्पर भिन्न जाती आहे. गांडूळास शरीरावर गोलाकार वलय असतात, तर वाळा सापास बारीक खवले असतात. गांडूळास जीभ नसते तर या सापास पांढरसर-गुलाबी जीभ असते. गांडूळ व या सापात एक साम्य असते, ते म्हणजे या दोघांमधे फक्त मादी आसते.

विनंती :-

आपल्या घरांत किंवा आपसासच्या जागेत साप वा इतर पशु-पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास त्यास पकडायचा प्रयत्न न करता जवळच्या सर्पमित्रांस बोलवावे किंवा हँलो फाँरेस्ट(१९२६)
वर काँल करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा