लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. ; आ.बबनराव शिंदे

सोलापूर, दि. २७ जुलै २०२०: माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्ताने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य हे थोर असून साहित्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रेरणा मिळाली व स्वातंत्र्यानंतर अखंड महाराष्ट्रासाठी ही त्यांनी लेखणीतून समाजामध्ये प्रेरणा निर्माण केली.

अण्णाभाऊंच्या कथा, कादंबर्‍या या दर्जेदार असून आधुनिक युगातही लोकोपयोगी लिखाण आहे. पोवाडे, लावण्या, तमाशा यांना त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या या महान कार्यामुळे अण्णाभाऊ साहित्यरत्न म्हणून ओळखले जातात. साठेनी भारतीय संस्कृतीचा ठेवा साहित्यातून जपवून तर ठेवलाच परंतु तो चिरकाळ कसा राहील यादृष्टीने साहित्य लिहिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य पोवाड्याच्या माध्यमातून व साहित्याच्या माध्यमातून सातासमुद्रापलीकडे नेली. फकीरा कादंबरीला तर महाराष्ट्र शासनाचा १९६१ सालचा सर्वोत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार मिळाला. अशा या थोर साहित्यिकाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी आपली मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा हीच मागणी असेल की मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व मीही पाठपुरावा करेन असेही आमदार बबनराव शिंदे पुढे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा