महा-ई सेवा केंद्रे रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार :

5

हडपसर, २८ जुलै २०२०: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र ३१ जुलै २०२० पर्यंत सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत किंवा रांगेतील शेतकरी संपेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहे.

कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणुन घोषित केलेला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोख्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमित केले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात लोकानी येवू नये म्हणुन सांयकाळी ५ ते सकाळी ७ या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा