आता चंपा, टरबुज्या बोलण्यावर सुड घ्या..

मुंबई, २९ जुलै २०२० : सध्या भाजपाची कार्यकारिणीची पहिली व्हर्युच्यल बैठक सुरू आहे. यामधे सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. ज्यामधे गेल्या अनेक दिवसांपासून पाहिले तर भाजपाच्या अनेक नेत्यांना सोशल मिडियावर त्यांच्या नावावरुन ट्रोल करण्यात येत आहे. या परिस्थितीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्यासाठी आव्हान केला आहे.

महाराष्ट्रात भाजपाचे नेते मंडळींचे नामकरण करण्यात आले आहे. ज्या अनेक नामांकित नेत्यांना लक्ष्य केले जाते. चंद्रकांत पाटील यांना “चंपा” आणि देवेंद्र फडणवीस यांना “टरबुज्या”असे बोलले जाते. यावर आता आपण प्रत्येकांने सुड घेतला पाहिजे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आणि सुड घेताना शब्द जपून वापरा जेणेकरून विधान मागे घेण्याची शक्यता नसेल असे ते म्हणाले.

ते सुडाची भाषा करत होते, कमेंट्समध्ये खाली लोक चंपा, टरबुज्या म्हणतच होते…

भाजपाने स्वबळावर लढायचे ठरवले आणि त्या नंतर एका पाठोपाठ एक त्यांचा आक्रमक पवित्रा समोर येत आहे. त्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांना सुड घ्यायला सांगितले खरे पण यांनी देखील विविध पक्षातील नेत्यांच्या नावाचे नामकरण केले. जसे पप्पू, वाकड्या तोंडाचा, मौन मोहन वगैरे म्हणत रहा असे स्वतःवर आलं तर पलटवार करा, अशी यांची शैली दिसली आहे. यावर अशी टिका होत आहे.

तसेच भाजपचे म्हणजे स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे बघायचे……अशी परिस्थिती झाल्याची देखील टिका, चर्चा सोशल मिडिया वर होत आहे. तर जेव्हा चंद्रकांत पाटील यांनी सुड घ्यायची भाषा केली तेव्हा त्यांच्या खालीच कमेंट्समध्ये अनेकांनी चंपा आणि टरबुज्या म्हणत त्यांची खिल्ली उडवली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा