हवेली तालुक्यात आज नोंदणी व मुद्रांक कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

लोणी काळभोर, दि. २८ जुलै २०२० : हवेली क्रमांक ०६ मुद्रांक कर्मचाऱ्यांचे आज लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष गोपीनाथराव कोळेकर प्रभारी सहदुय्यम निबंधक सतीश कुलकर्णी हवेली नं. ०६ नोंदणी मुद्रांक यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून १५ विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे दिले आहे.

त्यामध्ये संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, मुंबई विभागातील मुद्रांक विभागातील रिक्तपदे पदोन्नतीने भरण्यात यावीत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटूबियांना ५० लाख रूपयाची मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबियांना एक नोकरी देण्यात यावी या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

 

या अगोदर निवेदन देऊनही शासन दखल घेत नसून संघटनेच्या माध्यमातून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून दस्त करण्यासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे एकतर नोंदणी व मुद्रांक विभाग ऑनलाइन केल्यामुळे ग्रामीण भागात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत तीन ते चार दिवसांत दस्त नोंदणी होण्यासाठी लागतात. व ह्या मागण्या सरकारने मान्य नाही केल्यास पुढच्या महिन्यात ४ ऑगस्ट २०२० पासून बेमुदत लेखणी आंदोलन करण्यात येईल असे “न्यूज अनकट” शी बोलताना सतीश कुलकर्णी प्रभारी सह दुय्यम निबंधक हवेली नं. ०६ यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा