पीक विमा संदर्भात दादाजी भुसे यांची खा. ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट

उस्मानाबाद, २९ जुलै २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे पिक विमा भरताना पोर्टल वर शेतकऱ्यांची नावे ,७/१२ व ८ अ उतारे दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहत आहेत. या कारणास्तव, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिनांक २९ जुलै रोजी राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली.

ऑफलाईन विमा स्विकारण्यासह पीक विमा भरण्यास १५ दिवसांची मुदत वाढ देणेबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात यावी, अशी विनंती खा. ओमराजेंनी साहेबांना केली. मा. ना. दादाजी भुसे यांनी तात्काळ दखल घेऊन कृषी सचिव मा. एकनाथ ढवले यांना फोन करून कृषी विभाग आणि विमा कंपनी यांनी समन्वय साधून तक्रारीचे निवारण करावे. जिल्ह्यातील एकही शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सुचना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी, त्यांच्यासोबत कळंब – उस्मानाबादचे आ. कैलास घाडगे- पाटील हे देखील तेथे उपस्थित होते.

या सोबतच, शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी जिल्हा अधिक्षक कृषी श्री. उमेश घाडगे मो. नं. ९४२२७२१३१५, तसेच विमा कंपनी प्रतिनिधी किरण सपकाळे मो. नं. ९९७५५५८२७०,श्री.राजत धर मो. नं. ८८२६१७०३८३,९३०७३६००१२ यांच्याकडे द्याव्यात, असे आवाहन देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेतकऱ्यांना केले आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा