बुद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण विरुद्ध कर्जतमध्ये उपोषण

8

कर्जत, २९ जुलै २०२०: सिध्दटेक ग्राम पंचायत अंतर्गत येथील बुद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत वडार वस्ती येथील ग्रामस्थ व भास्कर भैलुमे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्जत पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे.

कर्जत तालुक्यातील मौजे  सिध्दटेक येथील नियोजित बौध्द विहाराची जागा गेल्या १० ते १२ वर्षा पासुन ही जागा नमुना नंबर ८ च्या फाॅर्मवर असून ही जागा ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करुन आपल्या जवळील व्यक्तींना अतिक्रमण करायला लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करताना या जागेवर बाळू सोमा पडळकर व लिंगाजी बाळू पडळकर यांनी अतिक्रमण केले असून ते तेथे बांधकाम करू पाहत असून या विषयी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत, सरपंच सिध्दटेक याना मागील एक दिड महिन्यापुर्वीच माहीती देऊन ही अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

नियोजित बौध्द विहाराच्या जागेवर आपल्या जवळील व्यक्तीना अतिक्रमण करायला लावणा-या ग्रामपंचायतच्या पदाधिका-यांसह अतिक्रमण केलेल्या व्यक्तीच्या विरोधात तात्काळ कार्यवाही करून तात्काळ नियोजीत बुध्द विहाराची जागा मोकळी करुन देण्यात यावी अशी मागणी भास्कर भैलुमे यांनी केली आहे. या अतिक्रमणासाठी ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी जबाबदार असतील त्याचे सदस्यत्व रद्द करुन गैरकारभार करणार्‍या पदाधिका-याला पदावरुन पायउतार करा असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष