नवी दिल्ली, ३० जुलै २०२०: भारताची शान बनलेले राफेल हे बुधवारी हरियाणातील अंबाला एयरबेस वर दाखल झाले. राफेल हे भारतात येण्याची बातमी जशी भारतीयांना कळाली तसा संपुर्ण देशभरात आंनदाची लाट उसळली आणि भारतातील प्रत्येकांने सोशल मिडियवर राफेल आणि भरताप्रतीचे देशप्रेम दाखवत भारतीय लष्कराचे आभिनंद आणि भारतात राफेलच स्वागत केले.
पंतप्रधानांनीं ट्विट करत केेलं स्वागत…..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल भारतात येताच संस्कृतमधे एक श्लोक ट्विट केला.”राष्ट्ररक्षासमं पुण्य,राष्ट्ररक्षासमं व्रतम्,राष्ट्ररक्षासमं यज्ञो नैव च नैव || नभ स्पृशं दिप्तम्”.हा श्लोक लिहिला.ज्याचा अर्थ राष्ट्र रक्षणासारखे पुण्य,राष्ट्र रक्षणासारखे व्रत,राष्ट्र रक्षणासारखे यज्ञ कुठेही नाही असा होतो.
भारतीयांना झाली मनोहर पर्रिकरांची आठवण….
भारतात राफेल दाखल झाली आणि भारतातील तमाम नागरिकांना मनोहर पर्रिकरांची आठवण आली.तुमची आठवण येत आहे,आज तुम्ही हवे होतात अशी सोशल मिडियावर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.राफेलवर वाद निर्माण झाला होता ज्यामध्ये पर्रिकरांवर अनेक आरोप करण्यात आले होते.त्यानंतर मोदी सरकारला क्लिन चिट देखील मिळाली होती.राफेलच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व जुन्या गोष्टी ताज्या होताना दिसल्या.
राफेलची वैशिष्टे….
१) राफेल मल्टीरोल फायटर विमान आहे.
२) आठ विमानांची कामे एकटा राफेल करु शकतो.म्हणून याला मल्टीरोल फायटर जेट म्हणतात.
३) राफेलचा जन्म होण्याआधी टेहाळणी,बाॅम्बिंग,अण्वस्त्र हल्ला या साठी वेगळी विमाने लागायची.
४) आता राफेल एकटा हि सर्व कामें करण्यासाठी सक्षम आहे.
राफेल सध्या ज्या अंबाला एअरबेसवर आहे. तिथून पाकिस्तान बाॅर्डर ही २२० किलोमीटर आंतरावर आहे. तज्ञांनी दिलेल्या आवाहालानुसार राफेल आवघ्या २० मिनटात इस्लामाबादला जाऊन पुर्ण राख करु शकतो. तसेच यामध्ये अनेक शस्त्र हि सहजरित्या घेऊन जाता येऊ शकतात त्या बरोबरच राफेल हा ३०० किलो मीटर मध्येही अचूक मारा करतो. तसेही अंबाला एअरबेस हा भारताचा सर्वात महत्वाचा एअरबेस म्हणुन ओळखला जातो आणि सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे पाकिस्तान आणि चीन कडे असे मल्टीरोल फायटर जेट नाही आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी