आमदार रोहित पवारांनी घेतली सिंचन भवन येथे आढावा  बैठक

कर्जत, दि.  ३० जुलै २०२०: आमदार रोहित पवार यांनी कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि उर्वरीत प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत धुमाळ यांच्या समवेत पुणे येथील सिंचन भवनात नुकतीच आढावा बैठक घेतली. पाणी नियोजन, भूसंपादन, चाऱ्याची दुरुस्ती आदी महत्वाच्या विषय सोडवत असताना अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेले हे विषय मार्गी लागले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या तसेच शेतकऱ्यांना पाणी नियोजनासंबंधी असणाऱ्या अडचणी याबाबत असणारी कामे वेगाने मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिले.
                   
मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आठवडाभरापुर्वी मतदारसंघातील रुईगव्हाण, कुळधरण, राक्षसवाडी, बारडगाव दगडी, पिंपळवाडी, करमनवाडी, करपडी, परीटवाडी, चिलवडी, राशीन, सोनाळवाडी, कोळवडी,अळसुंदे, धांडेवाडी, आंबीजळगाव, म्हाळंगी,लोणी मसदपुर, कोरेगाव, दिघी, निमगाव – डाकु, घुमरी, कोकणगाव, नागलवाडी, नवसरवाडी, माही, मलठन आदी गावात अधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसीय दौरा केला होता. तात्काळ शक्य असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचनाही दिल्या.
       
तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कुकडीचे अधिकारी, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही बैठकांमध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणुन घेत मार्गदर्शन केले होते. यावेळी पाणी संदर्भात प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अडचणी समजाऊन घेत त्या अडचणी लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. याच अनुषंगाने ही बैठक घेतल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
 

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा