कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक : राहुल कुल

दौंड, १ ऑगस्ट २०२० : दौंड तालुक्यात चौफुला येथे भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला.

भाजपाचे इतर मित्र पक्ष देखील या आंदोलनामध्ये सामील झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय मेटाकुटीला आलेले असताना बळीराजाने अन्नधान्य कोठेही कमी पडू दिले नाही म्हणून लॉकडाऊनच्या कडक नियमात देखील अनेक अडचणींचा सामना करीत शेतीमाल विविध ठिकाणी पोहचवण्याचे धाडस शेतकऱ्याने केले.

मात्र लॉकडाऊन मध्ये शिथिलता केली जात असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अशातच दूध उत्पादक शेतकरी देखील मेटाकुटीला आलेला असल्याने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

दौंड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने हे आंदोलन करीत असल्याचे मनोगत आमदार राहुल कुल,भाजपाचे जेष्ठ नेते वासुदेव काळे यांनी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा