सोलापूर : अनेकदा आपल्यासमोर छोट्या छोट्या गोष्टी आदर्श निर्माण करतात. त्यातून आपल्याला अनेक बारकावे शिकायला मिळतात. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली.
श्यामसुंदर पेटम्मा आडम (वय २२) या तरुणाने ज्या दिवशी मतदान होते. त्याच दिवशी आईच्या पोटात दुखू लागले. त्याने आपल्या आईला रुग्णालयात दाखल केले.परंतु परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला आईला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्याच आईचा मृत्यू झाला. त्या दुःखात असतानाही श्यामसुंदरने आपल्या आईच्या मृतदेहाला मुखाग्नी न देता आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाला. आपल्यावरील दुःखाचा डोंगर सावरत त्याने मतदान केले. मग त्यानंतर त्याने आपल्या आईच्या देहाला अग्नी दिला.
त्याच्या या विचाराचे, वागण्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याने एक आदर्श घालून दिला आहे.