बारामती, २ ऑगस्ट २०२० : बारामती शहरातील मारवड पेठेतील डॉक्टर महेंद्र रामनलाल दोषी वय वर्षे ६८ यांची फोन करून एका अनोळखी इसमाने बोलण्यात गुंतवून डॉक्टरांना मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड करायला लावून त्यांच्या खात्यातील ३.५० लाख रुपये काढून घेतले असल्याची तक्रार डॉ दोशी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
बारामती शहरातील मारवाड पेठेतील डॉ राजेंद्र दोषी हे दि २९ बुधवारी हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासत असताना दुपारी १ च्या सुमारास राकेश मल्होत्रा नावाच्या माणसाचा फोन करून हिंदीत बोलत पेटीएम कंपनीतून बोलतोय असे सांगून तुमचे बँकेतील केवायसी पूर्ण करायचे आहे. असे सांगून मोबाईल मध्ये क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करायला सांगितले व त्याचा आय डी माझ्याकडून मागून घेतला व त्यानंतर मला ऍक्सेस बँकेतून आलेला ओ टी पी नंबर मागून घेतला.
त्याच प्रमाणे आय सी आय सी आय बँकेतील खात्यावर आलेला ओ टी पी नंबर त्याच प्रमाणे त्यांची पत्नी संगीता दोशी हिच्या ऍक्सेस बँकेतील खात्यावरील असे एकूण तीन बँकेतील ओ टी पी नंबर घेऊन खात्यातील ऑनलाइन द्वारे ३.५० लाख रुपये काढून घेण्यात आल्याची तक्रार डॉ दोशी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात नोंदवला असून राकेश मल्होत्रा या व्यक्तीवर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.