पुणे, ४ ऑगस्ट २०२० : संभाजी भिडे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहतात. ज्यामुळे विविध समुदायातील लोक हे त्यांचावर सोशल मिडियाच्या माध्यमातून ताशेरे ओढताना दिसतात.तर अनेक वेळा त्यांच्या अशा वक्तव्यामुळे ते सोशल मिडियावर ट्रोल देखील होतात. तर सध्या देशात जोरदार तयारी सुरु असलेल्या राममंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
संभाजी भिडे यांनी ” रामाला मिश्या होत्या ” शतकापासून शिल्पकारांनी चुकी केली असावी असे वक्तव्य केले. तसेच यात दुरुस्ती झाली पाहिजे असे देखील ते म्हणाले, आणि पुढे ही शतकापासून चालू असलेली चूक सुधारा आणि राम मंदिरात मिशीवाल्या प्रभू रामाची मुर्ति बसवा असे ते म्हणाले.
त्यांच्या याच वक्तव्यावर सत्येंद्र जैन यांनी संभाजी भिडे यांच्यावर पलटवार केला असून,त्यांनी सांगितले की कधीही रामला, शिव, विष्णुला मिशा नव्हत्या आणि हिंदुधर्मात त्यांचे असेच पुजन केले जाते. हिंदू असून भिडेंना हिंदू धर्म समजलाच नाही अशी बोचरी टिका त्यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी