पुणे, ४ ऑगस्ट २०२०: पुण्यामध्ये असलेली पाणी कपात सध्या तरी हटवण्यात आली आहे त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुण्यात सध्या तरी पाणी कपात होणार नसल्याची माहिती पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेत पार पडलेल्या बैठकीतून मिळाली आहे. पुण्याच्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता होती.
पण, तूर्तास किमान गणेशोत्सवापर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय आज मंगळवारी बैठकीत घेण्यात आला आहे. यंदा धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पाण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पुण्यात मोठी पाणी कपात होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज झालेल्या बैठकीच्या निर्णयाने त्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे पुण्यातल्या दुकानांसदर्भात सुरू असलेली सम विषमची टांगती तलवारही लवकरच उठवण्यात येणार आहे व सम विषमचे बंधन आयुक्त लवकरच बैठकीतून उठवणार आहे. आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे