रशिया, ५ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या लसी बाबत अजूनही संपुर्ण जग प्रयत्नात आहे. तर यातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या १० ऑगस्टपूर्वी कोरोनाची लस बाजारात आणणार असल्याचे रशियन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही लस जगातली पहिली कोरोना लस ठरणार आहे.
सुरुवातीला रशियाकडून ही लस ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणण्याची तयारी केली गेली होती. मात्र, आता ती १० ऑगस्टपर्यंतच बाजारात येऊ शकते, असे रशियन वैज्ञानिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यासाठी लागणाऱ्या सरकारी स्तरावरच्या परवानग्यांसाठी काम सध्या सुरू आहे. या लसीच्या किती पातळ्यांवर चाचण्या झाल्या आहेत आणि त्या किती यशस्वी ठरल्या आहेत, याविषयी मात्र अद्याप पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.
ही लस बाजारात आल्यानंतर आधी डॉक्टर, नर्स अशा आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षतर ते पणे कोरोनाचा सामना करू शकेल आणि त्यांच्या उत्साह देखील वाढणार आहे.
भारतात देखील लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटकडून लस बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर भारताने हि लस विकत घेेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामध्ये रशियाने आम्ही भारताला नक्की हे औषध देऊ, असे सांगितले आहे. तर यावरुन पुन्हा एकदा रशिया हा भारताचा भक्कम मित्रराष्ट्र असल्याचे समोर आले आहे. तर लसीच्या सर्व क्लिनिकल ट्रायल पुर्ण झाल्याचे रशियाचे आरोग्य मंत्री मिखेल मुराश्को यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी