नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२० : मध्यमवर्गीय करदात्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. यासंदर्भात एका कार्यक्रमामध्ये निर्मला सीतारमण यांनी माहिती दिली. एका कार्यक्रमात अर्थमंत्री म्हणाल्या की, ‘करदाता राष्ट्र निर्माण करणारे आहेत आणि सरकार त्यांच्यासाठी चार्टर ऑफ राइट्स आणणार आहे.’
निर्मला सिताराम म्हणाल्या की जगामध्ये असे काही मोजकेच देश आहे जिथे करदात्यांसाठी चार्टर ऑफ राइट्स आहे. या मोजक्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या अधिकारांच्या सनदात करदात्यांच्या जबाबदाऱ्या व हक्कांचा उल्लेख केला जाईल. आम्ही करदात्यांचे हित लक्षात घेऊन हे प्रयत्न करीत आहोत.
अर्थसंकल्पात करदात्यांची सनद जाहीर करण्यात आली होती. याला वैधानिक दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे आणि यामुळे आयकर विभागामार्फत नागरिकांना समयबद्ध पद्धतीने सेवा पुरवली जाईल. करदात्यांनाही यात काही नवीन हक्क मिळू शकतात. तथापि, निर्मला सीतारमण यांनी या चार्टर ऑफ राईट्सबद्दल विस्तृत माहिती दिली नाही. परंतू त्यांनी याचाही उल्लेख केला की करदात्यांसाठी सरकार सातत्याने कर भरणे सुलभतेचे व जलद गतीने कसे होईल यावर भर देत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी