पुणे, दि. ८ ऑगस्ट २०२०: पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस (AIPC) पुणे, सेवास्था फॉऊंडेशन व पर्ल पॅकेजींग पुणे यांच्यातर्फे AIPC स्थापना दिन व ऑगस्ट क्रांतीदिन निमित्त आज दि. ८ ऑगस्ट २०२० रोजी, पुणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी कीट्सचे वितरण महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रिय कार्यलयात करण्यात आले. यावेळी एकूण ५०० सेफ्टी कीट्सचे वाटप करण्यात आले. ह्या वाटप कार्यक्रमासाठी महापालिका उपायुक्त नितीन उदासी, अति. आयुक्त किशोरी शिंदे, सॅनिटायझेशन इंसपेक्टर इनामदार यांचे सहकार्य लाभले.
तसेच कार्यक्रमाला शहर काँग्रेस अध्यक्ष मा. रमेश दादा बागवे, मा. अभय छाजेड, मा. गौरव बोराडे तसेच AIPC चे उपाध्यक्ष विक्रम देशमुख, लेखा नायर, मिलिंद गवंडी, शशांक पाटील, उमेश ठाकूर, संजय मानकर, जारा परवाल, निखील परवाल, राजसिंह निंबाळकर, यशराज पारखी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख किशोरी शिंदे यांच्याशी चर्चा करून कोरोनाचा आढावा घेतला आणि काही सूचना केल्या व कार्यकर्त्यांना कशी प्रशासनाला मदत करता येईल यावर मार्गदर्शन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.