कल्याण – डोंबिवलीत शिवसेनेने केला कर्नाटक सरकाचा निषेध 

14

कल्याण, ९ ऑगस्ट २०२०: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येड्यूरप्पा यांच्या विरोधात, आज कल्याण डोंबिवली मध्ये ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आले. त्यांनी येड्यूरप्पा यांच्या बॅनरवरील प्रतिमेला जोड्यांने मारून या आंदोलनाला सुरूवात झाली. या वेळेस त्यांनी  कर्नाटक सरकाचा निषेध केला. कल्याण ग्रामीण मधील १४ गावातील  शिवसैनिक यांनी एकत्र येत येड्यूरप्पा यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

अवघ्या, महाराष्ट्रांचे आराध्य दैवत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा” हटवल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येड्यूरप्पा यांच्या विरोधात निदर्शने सुरु आहेत. बेळगांव जिल्ह्यातील एका गावात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवा, असे येड्यूरप्पा यांनी म्हटल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कारण काय? असे प्रश्न येड्यूरप्पा यांना विचारले जात आहेत.

कल्याण तसेच डोंबिवलीमध्ये याचे पडसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. डोंबिवली शहरप्रमुख, नगरसेवक राजेश मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. तर कल्याणमध्ये  जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी  यावेळेस यांनी  जोडे मारो आंदोलन करून निषेध केला. त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याची काय गरज असे विचारले जात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे