अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी गाव बंद आंदोलन

कर्जत ९ ऑगस्ट २०२०: अंबिजळगाव मधील शेतकऱ्यांविरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ संपूर्ण गाव बंद करुन आंदोलन करण्यात आले. कर्जत पोलीस स्टेशनचे सहायक्क पोलीस निरीक्षक सुरेश माने यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

अंबिजळगाव मधील लक्ष्मण दशरथ निकत ,लहू दशरथ निकत व प्रल्हाद लक्ष्मण निकत यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदरील गुन्हा हा जानुन बुजुन वैयक्तिक द्वेषापोटी व सदरील शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी खोटा गुन्हा नोंदविला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी सचिन लालासाहेब शेटे हा गुंड प्रवृत्तीचा इसम असून, हा इसम गावामध्ये सतत गुन्हेगारी प्रवृत्तीने वागत असे. या इसमाने गावातील लोकांना या पूर्वीही शिवीगाकरणे,हाणामारी करणे व अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. सदर फिर्यादीच्या वागणुकीमुळे गावातील सर्वसामान्य जनता त्रस्त आहे असे सांगत खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी सरपंच विलास निकत यांनी केली आहे.

सदरील गुन्हा त्वरित माघारी घ्यावा अन्यथा सर्व ग्रामस्थातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व पुढील परिणामांना आपले प्रशासन व पोलीस विभाग जबाबदार राहील, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेद्र पाटिल, अनिल निकत, किशोर निकत, तात्या निकत, मा. सरपंच बाळासाहेब लोंढे, अजित अनारसे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम निकत, सागर निकत, गावचे पोलीस पाटिल बिभीषन अनारसे, काशीनाथ निकत व ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा