छत्रपतींचा पुतळा हटवल्या प्रकरणी वाल्ह्यात कर्नाटक सरकारचा निषेध

पुरंदर दि.९ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणी पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकामध्ये शिवप्रेमींनी आंदोलन करुन तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या घटनेच्या निषेधार्थ वाल्हे येथे पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी संतप्त शिवप्रेंमींनी आंदोलन करुन कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर यावेळी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी वाल्हेचे सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, सतिश सुर्यवंशी, भाऊसो भोसले, प्रा.संतोष नवले, डॉ.रोहिदास पवार, समदास भुजबळ, संदेश पवार, सुर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार, शशिकांत शिर्के, राहुल पवार, पतंग शहा आदिंसह शिवभक्त उपस्थित होते. यावेळी शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कर्नाटक सरकार हाय हाय’, आदि घोषणा देत कर्नाटक सरकारचा निषेध केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा