माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी…

बारामती, १० ऑगस्ट २०२०: कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या सध्याच्या मंदीच्या वातावरणात लाखो कामगार बेरोजगार होत असताना माळेगाव साखर कारखान्याच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.

देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू झाल्यापासून जयश्री पॉलिमर, फेस, अन्स्कूल, क्यूएच टालब्रोझ, मुग्धा इलेक्ट्रॉनिक्स, सिस्टीमॅटिक इत्यादी कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन माध्यमांच्या द्वारे प्रक्रिया राबवली. विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू व टेक्निकल इंटरव्ह्य़ू या दोन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली.

या निवड प्रक्रियेतून महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांची वरील कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. क्यूएच टालब्रोझ मध्ये निवड झाली यामध्ये यांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर फेस मध्ये पूजा कुंभार या विद्यार्थिनीचा निवडीमध्ये समावेश होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४.५ लाखांपर्यंत वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे डॉ. माधव राउळ यांनी दिली.तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे विविध वेबिनार मालिकांचे आयोजन करून देत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होत आहेत.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष
बाळासाहेब तावरे, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात व सचिव प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा