बीड, ११ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कोवीड १९ च्या संबंधित ना. धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली. वाढती रूग्ण संख्या ही जरी चिंतेची बाब असली तरी त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. तसेच, या बैठकीत त्यांनी अँटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवणे, त्यासाठी आवश्यक किट्सची उपलब्धता, उपलब्ध बेड, आवश्यकतेनुसार क्वारंटाईन सेंटर वाढवणे याबाबतीत च्या सूचना संबंधितांना दिल्या.
नव्याने बाधीत झालेल्या रुग्णांपैकी ज्यांना अजिबात लक्षणे नाहीत, अशांना विशेष खबरदारी पूर्वक संस्थात्मक किंवा योग्य काळजीसह घरीच अलगिकरणात विशेष अटींसह ठेवता येणार आहे. यासोबतच, अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील नवीन १००० बेडची क्षमता असलेले रुग्णालय देखील आत्ता सज्ज झाले असून त्याचे काम अंतीम टप्प्यात असल्याचे, ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले.
हा लॉकडाऊन कोरोनाच्या फैलावास ब्रेक डाऊन ठरावा या दृष्टीने आपण प्रशासनाला सहकार्य करा. हा लॉकडाऊन शेवटचा ठरावा या दृष्टीने सर्वांनी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केलेले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.