रेल्वे सेवा बंदच, रेल्वेचे पत्रक खोटे……

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२० : देशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या हि वाढतच चालली असून यावर भारतीय रेल्वेने १२ ऑगस्टपर्यंत मेल,एक्सप्रेस, प्रवासी वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवा रद्द केलेली आहे.

त्याचप्रमाणे १ जुलै ते १२ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रवाशांनी बुक केलेली सर्व रेल्वे तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. मात्र आता ३० सप्टेंबरपर्यंत मेल, एक्स्प्रेस आणि लोकल बंद राहणार आहे, अशा आशयाचे पत्रक समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. आता या निर्णयाला मुदत वाढ मिळाली असल्याची चर्चा होत आहे. पण या पत्रातील माहितीत तथ्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगण्यात आले आहे.

२२ मार्चपासून देशातील रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, १ मे पासून विविध राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीकरिता श्रमिक ट्रेन १२ मे पासून देशातील निवडक १५ मार्गावर राजधानी स्पेशल ट्रेन आणि १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी १५ जूनपासून मर्यादित लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला अत्यावश्यक कर्मचार्‍यांकरता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला ७५० पेक्षा जास्त फेर्‍या चालवण्यात येत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा