बारामती ११ ऑगस्ट २०२० : शहर पोलिसांनी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव व सध्या असणाऱ्या कोरोना महामारीच्या धर्तीवर बारामती शहरातील गणेश मंडळांची बैठक आज दि ११ रोजी घेण्यात आली होती.यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी गणेश मंडळांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंदिरातच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
दरवर्षी वाजत गाजत येणाऱ्या गणरायाची यंदा दि २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. मात्र कोरोना विषाणूच्या संकटाने शासनाने दिलेल्या नियमानुसार शहर पोलिसांनी आज सर्व गणेश मंडळांची बैठक बोलावली होती यावेळी अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी गणेश मंडळांना सार्वजनिकरित्या गणपती मंडळ स्थापन करू नये सध्या मंदिरात असणाऱ्या गणरायाची तिथेच पूजा अर्चा करावी रस्त्यावर स्टेज किंवा मांडव घालू नये तसेच गर्दी करू नये,प्रत्येक मंडळाची पाच कार्यकर्ते स्पेशल पोलीस म्ह्णून नावे द्यावीत हे तरुण विनामास्क लावलेल्या,गर्दी करणाऱ्या,डबल सीट दुचाकीस्वार तर अनियमित हॉटेल वर कारवाई करण्याची परवानगी देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले तर गणेश मंडळांनी जमा झालेली वर्गणी कोविड सेंटरला मदत म्हणून देण्यात यावी असे आवाहन केले आहे.यावेळी शहरातील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.याबाबतीत शहरातील अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ व बारामती गणेश फेस्टिव्हल या मंडळांनी यंदा फेस्टिव्हलचे आयोजन न करता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी