संजय दत्तला तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कर्करोग.

18

मुंबई, १२ ऑगस्ट २०२०: संजय दत्तच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी. संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. त्याला अ‍ॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर आहे. वृत्तानुसार, तो आपल्या उपचारासाठी अमेरिकेत जाऊ शकतो. मात्र, यासंदर्भात संजय दत्त कडून कोणतेही विधान आले नाही मात्र त्याचे कुटुंबिय उद्या याविषयीची घोषणा करू शकतात. छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर ८ ऑगस्ट रोजी त्याला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची कोविड -१९ चाचणी केली होती, ज्याचे अहवाल नकारात्मक आले. रुग्णालयात दोन दिवस घालवल्यानंतर संजय सुट्टीनंतर १० ऑगस्टला घरी परतला.

दवाखान्यातून परत आल्यापासून त्याने जाहीर केले होते की त्याची तब्येत बरी नाही आणि त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. यानंतर त्यानी एका सोशल मीडिया पोस्ट मधून सांगितले की मी कामापासून थोडा वेळ विश्रांती घेत आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले- ‘मित्रांनो, मी वैद्यकीय उपचारासाठी थोडा ब्रेक घेत आहे. माझे मित्र आणि कुटुंबीय माझ्यासोबत आहेत आणि मला आवडतं की माझ्या प्रियजनांनी निराश होऊ नये आणि कसलेही अनुमान काढू नये. तुमच्या प्रेमामुळे व प्रार्थनेने मी लवकरच परत येईन.

संजय दत्तचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत

वर्कफ्रंटबद्दल बोलताना संजय दत्त बर्‍यापैकी व्यस्त आहे. ‘सडक २’ चित्रपटामध्ये तो आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूरच्या सोबत दिसणार आहे. याशिवाय त्याचा ‘टोरबाज’ हा चित्रपटही काही काळानंतर प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी अभिनेता यशबरोबर केजीएफ भाग २ मध्ये दिसणार आहे. अलीकडेच संजय दत्तच्या केजीएफ पार्ट २ शी संबंधित लूकही रिलीज करण्यात आला आहे, त्यात संजयच्या लूकचेही खूप कौतुक झाले. या व्यतिरिक्त तो अजय देवगण सोबत एका चित्रपटातही काम करत आहे.

संजय दत्तच्या कर्करोगाची ही बातमी व्हायरल होताच संजय दत्तचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या साठी प्रार्थना करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी