पुणे, १२ ऑगस्ट २०२०: ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है’, राहत इंदौरी यांची ही ओळ नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि भारतीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधकांसाठी एक मोठा आवाज बनली. सीएए-एनआरसीच्या निषेधाच्या वेळी राहत इंदोरी यांच्या या शायरी ने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदौरी यांच्या या ओळीचे पोस्टर्स आंदोलकांच्या हातामध्ये देखील बघण्यास मिळाले.
प्रत्यक्षात सीएए-एनआरसीच्या मुद्यावर राहत इंदौरी यांनी आपले म्हणणे मांडले होते की हा देश कोणत्याही व्यक्ती विशेष, पक्ष किंवा धर्माची संपत्ती नाही. हा मुद्दा शायरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर मांडताना असे म्हटले की, ‘सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है.’
‘लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द में
यहां पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है,
जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं, ज़ाती मकान थोड़ी है,
सभी का ख़ून है शामिल यहां की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!
सीएए-एनआरसीच्या निषेधांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या शायरी वरून राहत इंदोरी यांनी आनंद व्यक्त करत असे म्हटले होते की, ‘लोक आपल्या मागण्या मांडण्यासाठी याचा उपयोग करीत असल्याबद्दल आनंद होत आहे. या शेर बाबत बोलताना राहत इंदौरी म्हटले होते की, ‘हा शेर प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे ज्याला आपल्या भारतासाठी बलिदान करण्याची आवड आहे. ‘ ते असेही म्हणाले की मी जिथेही जातो तिथे लोक ही शायरी बोलण्याची आणि त्यासाठीची विनंती करत असतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी