डोंबिवली, १५ ऑगस्ट २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अद्याप तरी जनजीवन हे सुरळीत झालेले नाही. दहीहंडीच्या सणात सुद्धा यंदा शूकशूकाट पाहायला मिळाला. त्यामुळे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सण कसे साजरे करायचे हा प्रश्न पडला होता. मात्र आज स्वातंत्र दिवस साजरा करण्यासाठी डोंबिवलीकरांनी अनोखी शक्कल लावली होती.
डोंबिवलीतील लोढा रेजन्सी या परिसरात नागरिकांनी झूम सॉफ्टवेयरवर ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पाडला. परिसरातील सर्व रहिवाशी जर ध्वजारोहनास आले तर गर्दी होणार आणि हीच गोष्ट टाळत झूम सॉफ्टवेयरवरच्या मदतीने हा कार्यक्रम पार पाडला. या वेळेस मोजकेच मंडळी ध्वजारोहनस्थळी उपस्थित होते. सरकारच्या नियमांचे सर्व पालन पालन करत मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळत स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण साजरे झाले नाहीत तरी चालेल पण ज्यांनी आपल्याला स्वातंत्र दिले त्यांच्या बलिदानासाठी आपण सोशल डिस्टंसिंग पाळून हा स्वातंत्र दिवस साजरा केलाच पाहिजे, असे यावेळी ध्वजारोहनस्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. त्याचबरोबर ऑनलाईन ध्वजारोहनात सुद्धा नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे भारताचे नागरिक होण्याचे कर्तव्य डोंबिवलीकरांनी पार पाडले .
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे