पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

5

पुणे, १७ ऑगस्ट २०२० : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते हाफकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. तर डॉ. राजेश देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाकडून सोमवारी काढण्यात आले आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. पुणे जिल्हाधिकारीपदी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यामध्ये प्रामुख्याने डॉ. देशमुख यांचेच नाव चर्चेत व आघाडीवर होते. तर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

डॉ. देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून देखील या आधी कामे पाहिलेले आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अखेर शासनाने पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा