वघोली, दि. १९ ऑगस्ट २०२०: आज भाजपा पुणे जिल्हा मोर्चा संघटना सरचिटणीस पदी वाघोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप सातव, यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, संघटना मंत्री रवी आनासपुरे, पुणे जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, यांच्या उपस्थितीत सातव यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
वाघोली परिसरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातव यांच्या कडून आंदोलने, रस्ता रोको, राजकीय कार्य आदी कामे सातव यांनी केली आहेत. पुणे जिल्हा कार्यकारणी मध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे संदीप सातव यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे











































.jpeg?updatedAt=1738573708746)