जुबिलंट लाईफ सायन्सेस तर्फे शेतकर्‍यांना चौदा हजार झाडांच्या वाटपास सुरवात

पुरंदर दि.२२ ऑगस्ट २०२० : पुरंदर तालुक्यातील नीरा येथील ज्युबिलंट लाईफ सायन्ससेस संचलित, जुबिलंट भारतीया फाऊंडेशनच्या कृषी मित्र प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून जुबिलंट कंपनीने सुमारे ७०० शेतकर्‍यांची वृक्ष लागवडीसाठी निवड केली. यामध्ये निवडण्यात आलेल्या शेतकर्‍यांना १४००० झाडे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही झाडे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात किंवा बांधावर लावायची आहेत.या कार्यक्रमाचा सुभारंभ जुबिलंटचे उपाध्यक्ष सतिश भट यांच्या हस्ते पारपडला

जुबिलंट लाईफ सायन्सेस तर्फे शेतकर्‍यांना चौदा हजार झाडांचे वाटप करण्यात येत आहे.यासाठीनिरा,निंबुत,पाडेगाव,पाडेगावफार्म, वाघाळवाडी, वाणेवाडी,कर्नालवाडी,गुळूंचे,वाल्हा,पिंपरे,पिसुर्टी, मिरेवाडी, मूर्टी आणि पिंगोरी या गावांतील शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरूवात वाघाळवाडी गावातून सुरू झाली. ही झाडे वाटपाचा आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम जुबिलंटचे उपाध्यक्ष सतिश भट यांच्या हस्ते पार पडला. त्याच बरोबर ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक अजय ढगे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.या प्रसंगी उपसरपंच जितेंद्र सकुंडे,ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, ज्युबीलंटचे राजेंद्र राघव,निशांत फड,इसाक मुजावर,सुर्यकांत पाटील,दीपक सोनटक्के हे जुबिलंटचे अधिकारी व फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक अजय ढगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केसर आंबा,पेरू,सीताफळ,नारळ,लिंबू,शेवगा अशी रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना फळबाग लागवडीसाठी मदत होणार आहे,तसेच पर्यावरण संवर्धन करण्यात देखील मदत होईल. याप्रसंगी ज्युबिलंटचे सतीश भट म्हणाले की,शेतकर्‍यांना झाडांच्या माध्यमातून उत्पन्न मिळावे, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे हा आमचा उद्देश्य आहे.झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शेतकर्‍यांची आहे. पुढील तीन वर्ष या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही दिलेली झाडे कशाप्रकारे वाढवली जातात याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा