मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२०: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मंत्रालयाने यापूर्वी ३० मार्च आणि ९ जून रोजी मोटार वाहन कायदा-१९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. त्यात फिटनेस, परमिट (सर्व प्रकार), परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२० असल्याचे सांगितले होते.

देशभरातील कोविड-१९ संक्रमण परिस्थिती पाहता, वर निर्देशित केलेली कागदपत्रे ज्यांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे किंवा ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणार आहे, त्या सर्वांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाचा नागरिकांना वाहतुकीसंबंधी सेवा घेताना लाभ होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा