महाड दुर्घटनेच्या अठरा तासांनंतर सहा वर्षाचा चिमुकला सुखरुप बाहेर…

रायगड, २५ ऑगस्ट २०२० : रायगड जिल्ह्यात काल एक मोठी दुर्घटना समोर आली. एक पाच मजली इमारत कोसळून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत ६० जणांना या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही ढिगार्‍यात १८ जण अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. पण या सर्वात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. घटनेला १८ तास उलटून गेले असले तरी ढिगार्‍यातून ५ वर्षाच्या चिमुरड्याला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या तुकडीला यश आलं आहे.

पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला पोहचल्यानंतर मदत कार्याला जोरदार सुरवात करण्यात आली आहे. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ८ तव, १० जेसीबी, ४ पोखलेन तसेच, १५ डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. सध्या पुणे, महाबळेश्वर ट्रेकर्स, पनवेल येथून फायर ब्रिगेडची टीम महाडमध्ये दाखल झाली आहे.

निकृष्ट बांधकामाचा नमुना

तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधित बिल्डरकडे करत होते. मात्र, नगरपरिषदेत तक्रारी करु नका मी दुरुस्ती करुन देतो अशी बोळवण या बिल्डरकडून केली जात होती, अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली. दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्किंगमधील एक खांब ढासळल्याची बाब या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्याने पुन्हा रहिवाशांची समजूत काढली होती. त्यानंतर सुमारे सात तासांतच ही इमारत पूर्णपणे कोसळली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा